जिल्ह्यातील आतापर्यंत लिथोट्रप्सीद्वारे केलेली दुसरी शस्त्रक्रिया
महागाव – येथील संत गजानन महाराज रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करणारे डॉ. श्वेनिल शहा व टीम
महागाव येथील संत गजानन महाराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गडहिंग्लज येथील ७६ वर्षीय रुग्णावर इंटरव्हेशनल रेडिओलॉजी अंतर्गत उजव्या पायाच्या व पोटातील रक्तवाहिनीवर लिथोट्रप्सीद्वारे अतिशय गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी करून येथील डॉक्टरांच्या टीमने जीवदान दिले. कोल्हापूर जिल्ह्यात अशा प्रकारचे दुसरी यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यासाठी महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ मिळाला.
गडहिंग्लज येथील रुग्णाच्या उजव्या पायाला शुगर नसतानाही जखम बरी होत नव्हती. त्यामुळे सोनोग्राफी केल्यानंतर पोटाला रक्तपुरवठा करणाऱ्या ओरटा नावाची मुख्य नस व पायाला रक्तपुरवठा करणाऱ्या दोन्ही नसा शंभर टक्के ब्लॉकेज होत्या. तत्पूर्वी सदर रुग्णांनी कोल्हापूर येथील एका रुग्णालयात सिटीस्कॅन केल्यानंतर रक्तपुरवठा करणाऱ्या ओरटा नावाची रक्तवाहिनीत शंभर टक्के ब्लॉकेज असल्याने पोट फाडून पायाची नस जोडून शस्त्रक्रिया करावी लागणार होती. परंतु रुग्ण वृद्ध असल्याने ते शक्य नव्हते. त्यामुळे सदर रुग्ण महागाव येथील संत गजानन महाराज हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. येथील तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरांच्या टीमने साडेतीन तासाच्या अथक प्रयत्नातून अँजिओग्राफीच्या माध्यमातून लिथोट्रप्सीद्वारे रक्तवाहिनीत साचलेले कॅल्शियम व रक्ताच्या गुठळ्या शस्त्रक्रिया न करता मोकळ्या करून डॉ. श्वेनिल शहा व त्यांच्या टीमने रुग्णाला जीवदान दिले.

रुग्णालयात डॉक्टरांची अनुभवी व तज्ज्ञ टीम-
डॉ. यशवंत चव्हाण
अशा प्रकारच्या अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया या रुग्णालयात केल्या जातात. त्यासाठी आवश्यक असणारी तज्ज्ञ व अनुभवी डॉ. प्रियंका पाटील, डॉ. विनायक कांबळे, डॉ. रोहिणी जगताप, डॉ. रोहिणी पाटील, डॉ.प्रतिभा चव्हाण, डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ. रुपाली कोरी ही टीम रुग्णालयात उपलब्ध आहे. सध्या या रुग्णांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती डॉ. यशवंत चव्हाण यांनी दिली.

नातेवाईकांनी रुग्णांची शस्त्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल डॉक्टरांचे व हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.