ग्रामीण भागात बायपासला बायपास करणारी पहिलीच शस्त्रक्रिया,डॉक्टर टीमने वृद्ध महिलेला दिले जीवदान
महागाव येथील संत गजानन महाराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अडकुर (तालुका चंदगड)येथील ७५ वर्षीय वृद्ध महिला रुग्णावर हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या तिन्ही रक्त वाहिन्या कॅल्शियमने भरलेल्या होत्या.बायपासची शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते.अशावेळी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शॉकवेव लिथो ट्रीपसीच्या माध्यमातून रक्तवाहिणीत साचलेले कॅल्शियम काढून तिन्ही रक्तवाहिन्या प्रवाहित केल्या.

अशा प्रकारची अतिशय जोकमीची व गुंतागुंतीची बायपासला बायपास करणारी शस्त्रक्रिया यशस्वी करून येथील डॉक्टरांच्या टीमने जीवदान दिले.कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात अशा प्रकारचे पहिलीच शस्त्रक्रिया झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.हे शस्त्रक्रिया धर्मादाय फंडातून केली आहे.

अडकूर येथील येथील ७५ वर्षीय वृद्ध महिलेला हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालय दाखल करण्यात आले होते. रुग्णाच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या तिन्ही रक्त वाहिन्या कॅल्शियमने भरलेल्या होत्या.त्यातील मुख्य रक्तवाहिनी ९० टक्के तर इतर दोन्ही ९५ टक्के ब्लॉकेज होते.बायपासची शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते.अशावेळी येथील तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरच्या टीमने आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शॉकवेव लिथो ट्रीपसीच्या माध्यमातून रक्तवाहिणीत साचलेले कॅल्शियम फोडण्यासाठी अंदाजे अडीच लाखाचे मेरील कंपनीचे ‘ MASON ‘ मशीन मुंबईहून मागवले. त्याच्या सहाय्याने बायपासला बायपास करणारी अतिशय जोकमीची व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया जवळपास तीन ते साडेतीन तास करून रुग्णाला जीवदान दिले.

अशा प्रकारच्या अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया या हॉस्पिटलमध्ये केल्या जातात. यासाठी तज्ज्ञ व अनुभवी डॉ.शेखर भिसे, डॉ. प्रियंका पाटील, डॉ.विनायक कांबळे, डॉ. रोहिणी जगताप, डॉ. रोहिणी पाटील, डॉ.प्रतिभा चव्हाण, डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ.रुपाली कोरी ही टीम परिश्रम घेत आहेत.सध्या या रुग्णांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती डॉ. यशवंत चव्हाण यांनी दिली. नातेवाईकांनी रुग्णांची शस्त्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल डॉक्टरांचे व हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.