महागाव येथील संत गजानन महाराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया केलेले डॉ.दिग्विजय घोडके, डॉ. यशवंत चव्हाण व टीम 

महागावच्या संत गजानन हॉस्पिटलमध्ये गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेतून ६० वर्षीय रुग्णाला दिले जीवदान

महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत झाली शस्त्रक्रिया

महागाव (तालुका गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज  मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात ६० वर्षाच्या वृद्धाची डाव्या हाताची बंद पडलेल्या रक्तवाहिनीची अत्यंत अवघड, जिकीरीची व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया येथील तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरच्या टीमने यशस्वीपणे केली. ग्रामीण भागात प्रथमच ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. तसेच ही शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत केली असल्याची माहिती डॉ.यशवंत चव्हाण यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी,  गारगोटी येथील ६०  वर्षे वयाचा रुग्ण हाताला रक्तपुरवठा होत नसल्याने वेदना होत होत्या व डोके प्रचंड दुखत होते.अनेक ठिकाणी उपचार घेतले परंतु वेदना कमी होत नव्हत्या.कोल्हापुरातील हॉस्पिटलमध्ये दाखल झाला.शस्त्रक्रिये नंतर हात व्यवस्थित होईल याची खात्री देऊ शकत नाही असे सांगितले. हाताश झालेल्या हा रुग्ण संत गजानन रुरल हॉस्पिटलमध्ये दाखल झाला.येथील तज्ञ व अनुभवी डॉक्टरच्या टीमने हृदयापासून निघणारी डाव्या हाताला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी शंभर टक्के बंद झाली होती.त्यामुळे प्रचंड वेदना व हात काळा पडण्याची शक्यता होती.सदर ठिकाणी स्टेन टाकून रक्तपुरवठा सुरळीत करून सदरच्या रुग्णाला जीवदान दिले. अत्यंत जोखीमेची शस्त्रक्रिया करताना रक्तवाहिनी खुली ठेवण्यासाठी धातूची नळी वापरण्यात आली असून कोणतीही चिरफाड न करता रक्तवाहिणीतून बारीक ट्यूबद्वारे  बलून ने रक्तवाहिनी स्ट्रेच करून स्टेंट बसवला आहे.

यासाठी रेडिओलॉजिस्ट डॉ.दिग्विजय घोडके,भूलतज्ज्ञ डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. प्रतिभा चव्हाण,डॉ.प्रियांका पाटील,डॉ.रूपाली कोरी,विनायक कांबळे,सुशांत पाटील,ऋत्विक मोहिते यांच्या  टीमचे सहकार्य मिळाले.