logo
NABH-loog

संत गजानन फार्मसी महाविद्यालयात फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम व पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धा उत्साहात. 

महागाव (तालुका गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज फार्मसी महाविद्यालयात फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम व बी फार्मसी विद्यार्थ्यांसाठी पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा उत्साह झाल्या.

 विद्यार्थ्यांमध्ये कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता जागृत करणे हा या स्पर्धेचा उद्देश होता. ‘रेसेंट ट्रेंड्स अँड इंनोवेशन्स इन क्लिनिकल ट्रायलस अँड फार्माकोव्हिजिलन्स ‘या तत्त्वावर कार्यक्रमाची थीम होती. फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम साठी प्रमुख वक्ते म्हणून पहिल्या दिवशी श्री. देवेन बाबारे तर दुसऱ्या दिवशी डॉ. विष्णू कांग्रालकर (प्राचार्य मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी बेळगाव) डॉ. इस्माईल पाशा (अस्मारा,साऊथ आफ्रिका) डॉ. मुलगेटे रसंम (अस्मारा,साऊथ आफ्रिका) यांचे मार्गदर्शन लाभले.विद्यार्थ्यांनी पोस्टर्सच्या माध्यमातून त्यांचे कलात्मक कौशल्य प्रदर्शित केले. सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत मोठ्या उत्साहाने भाग घेतला. 

यावेळी परीक्षक म्हणून ऋतुजा शहा (प्राध्यापक आनंदी फार्मसी कॉलेज कळे) उपस्थीत होत्या. पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषक श्रेया जाधव व अमृता कुपडे (आप्पासाहेब बिरणाळे कॉलेज ऑफ फार्मसी सांगली) तर महेक गवसेकर व प्रीती करिगार ( संत गजानन महाराज कॉलेज ऑफ़ फ़ार्मेसी) यानीं द्वितीय पारितोषिक मिळविले. तृतीय पारितोषक निकिता फडतरे व अंबिका पुजारी (कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसी कराड) तसेच तृतीय पारितोषक पूर्वा भोपळे (भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर) यांनी मिळवले. 

यासाठी  प्राचार्य डॉ.ए.म.पटेल यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वीतेबदल संस्थेचे अध्यक्ष अॕड.आण्णासाहेब चव्हाण विश्वस्त डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण यांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा. आरती कापसे,  प्रा. सुमित जोशी प्रा. स्वप्नील हराळे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आरती कापसे यांनी केले तर डॉ.अर्चना मगदूम यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे  सहकार्य लाभले.