logo
NABH-loog

 संत गजानन फार्मसी पदविकेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत..

मकरंद पाटील, श्रेया देवर्डेकर यांनी पटकावले मिस्टर व मिस फ्रेशर चा किताब..

 रवि गवळी…….✍️

हागाव (तालुका गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज पदवीका (डी. फार्मसी) मधील प्रथम वर्ष नवागत विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात व जल्लोषात करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अभिनव ॲकॅडमीचे संचालक डॉ. अमोल पाटील हे होते तर अध्यक्षस्थानी संस्था सचिव ॲड बाळासाहेब चव्हाण हे होते.

स्वागत व प्रस्तावना प्राचार्य डॉ. अजिंक्य चव्हाण यांनी केले. यावेळी त्यांनी कॉलेजमधील विविध उपक्रम व संस्थेविषयी माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यामध्ये मिस्टर फ्रेशर म्हणून मकरंद पाटील तर मिस फ्रेशर म्हणून श्रेया देवार्डेकर यांना किताब बहाल करून गौरवण्यात आले. 

शिक्षण समूहाच्या मैदानावरच हा कार्यक्रम झाला. यासाठी भव्य आकर्षक मंडप उभारणी करण्यात आली होती. विद्युत रोषणाईने मंडप परिसर अधिकच उजाळून निघाला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध नृत्य व कला सादर करून उपस्थितांची वाहवा…. मिळवली. 

विविध फनी गेम्सचे आयोजन करून विजेत्यांना आकर्षक गिफ्ट देण्यात आले. विद्यार्थिनी वैष्णवी हेब्बाळे यांच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमाला अधिकच रंगत आली… या रंगा रंग कार्यक्रमांमध्ये नवागात विद्यार्थी अधिकच भारावून गेले त्यांच्यासाठी हा दिवस अविस्मरणीय ठरला. स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अन्सार पटेल,संस्थेचे विकास अधिकारी प्रा. डी. बी. केस्ती, यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांची उपस्थिती होती.आभार प्रा.सचिन पाटील यांनी मानले.

——————————————————————–

शिक्षण हे आर्थिक, मानसिक व सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे-अँड.बाळासाहेब चव्हाण 

यावेळी ॲड.बाळासाहेब चव्हाण अध्यक्ष स्थानावरून बोलताना म्हणाले “ॲड.डॉ. अण्णासाहेब चव्हाण यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना स्वस्त दरात व उच्च दर्जाचे आरोग्य सुविधा मिळावा या हेतूने महागाव व हसुरवाडी येथे हॉस्पिटलची स्थापना केली. या हॉस्पिटलमधून सर्व प्रकारचे उपचार चालू आहे. याचा फायदा गोरगरीब जनतेला होत आहे. तसेच ग्रामीण विविध भागातील विद्यार्थ्यांनाही कमीत कमी खर्चात उच्च शिक्षण मिळावे यासाठी या शिक्षण संस्थेची उभारणी केली आहे. विद्यार्थ्यांना जर जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर त्यांच्याकडे प्रबळ इच्छा शक्ती असायला हवे. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. शिक्षण हे आर्थिक, मानसिक व सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे. याचा उपयोग आपण समाज विकासासाठी केला पाहिजे  एक आदर्श शिक्षण संस्था घडवायचे असेल तर विद्यार्थी,पालक व कर्मचारी यांचा नाळ जुळला पाहिजे तरच त्याला भरभराटी येऊ शकतो. संस्थेच्या व कॉलेजच्या विकासासाठी आम्ही विश्वस्त कधीच कमी पडणार नाही. अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली”.

——————————————————————–

https://www.blogger.com/video.g?token=AD6v5dyOEl2TYYfbrJpCio9WDguMe8Cek-Q4IsNF7g5mCUjwI8ADgG1VRib6vQSnPaif4zYFxQALuEU1CaH-S8BkjSxz2iTm0R6Noy-tSidFxY0sspIeUUcUNpuB7_p_5SaKRlhTyG4

https://www.blogger.com/video.g?token=AD6v5dwdhCm8G6Lcifs2EbiQGIhF2h7C7bRingDguGDQ_5_l-AJVZ64MgcoYr1d6GlY44iXMZ73NoNwYItklLkRdkGRrj86ffkEWv0S08w7ql3oDQq_dJAX2Zb1Z8RmWdH50m9bC0ub4

——————————————————————–

यशासाठी हार्डवर्क करायलाच हवे -डॉ.अमोल पाटील.

 “विविध प्रकारच्या परीक्षेत यश मिळवायचे असेल तर आत्मविश्वास, जिद्द आणि कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. या परीक्षे मधूनच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत वाढतो. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आत्ताच कठोर परिश्रम घेणे आवश्यक आहे कुठल्याही क्षेत्रात कष्टाला शॉर्टकट नाही. प्रत्येक टप्प्यावर कष्ट करावेच लागणार आहे तरच आपले ध्येय साध्य होणार आहे.”