महागाव (तालुका गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचा २८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.स्वागत विश्वस्त डॉ.यशवंत चव्हाण यांनी केले. संस्थाध्यक्ष ॲड.आण्णासाहेब चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.

यावेळी मुख्य प्रशासकीय इमारतीमधील नूतनीकरण केलेले व्ही.सी.रूमचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

दरम्यान सर्व विभागातील प्राचार्यांच्या हस्ते रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. वर्धापनदिनानिमित्त अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.



यावेळी विश्वस्त डॉ. संजय चव्हाण,डॉ.प्रतीभा चव्हाण, डॉ.सुरेखा चव्हाण,सचिव ॲड. बाळासाहेब चव्हाण,प्रा.डी.बी. केस्ती, प्राचार्य डॉ.संजय सावंत,डॉ.मंगल मोरबाळे, प्रा. आर.एस.पाटील ,डॉ.अन्सार पटेल, डॉ.अजिंक्य चव्हाण,सुकेशनी कांबळे,डॉ रूपाली कोरी, डॉ. विनायक कांबळे, डॉ. रेश्मा निऊगरे,डॉ.रोहिणी जगताप, डॉ. रोहिणी पाटील, डॉ. सायली सांगरुळकर, यासह हॉस्पिटल मधील डॉक्टर्स, कर्मचारी उपस्थित होते. आभार सचिव ॲड बाळासाहेब चव्हाण यांनी मानले.
